Chhatrapati Shivaji maharaj Birth Anniversary

आज सोमवार दिनांक 21मार्च2022 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथी नुसार जयंती निमित्त विकास पब्लिक स्कूल जानकिनगर, नागपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वात्सल्य फाउंडेशन तर्फे अध्यक्ष डॉ प्रविण डहाके व ज्येष्ठ सदस्य श्री रवींद्र पराते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री विकास इंगोले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले व डॉ प्रविण डहाके यांनी विद्यार्थ्याच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. या कार्यक्रमात एकूण 100 विद्यार्थ्यांनी व 12 शिक्षकांनी भाग घेतला. जय भवानी जय शिवाजी!!!

Scroll to top