दिनांक 14/11/2023 मंगळवार दिवशी बालक दिना निमित्त वात्सल्य चाईल्ड वेलफेअर फाऊंडेशन तर्फे डहाके हॉस्पिटल नागपूर येथे बाल मित्रान करिता चित्र कला स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्क्रमाअंतर्गत 25 मुला मुलींनी सहभाग घेतला. सर्वांना वात्सल्य फाऊंडेशन तर्फे चित्रकला साहित्य तसेच खाऊ पुरविण्यात आले. तसेच विजेत्या 5 स्पर्धकांना जजेस तर्फे प्रत्येकी 100/- रुपये बक्षिस देण्यात आले. स्पर्धेचे judges श्री रविंद्र पराते, सौ पराते, श्री दिनेश मेंढे, कु अदिती डहाके तसेच अथर्व डहाके हे होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ प्रविण डहाके यांनी केले. तसेच डहाके हॉस्पिटल येथील सिस्टर मेघा, सिस्टर वैशाली आणि सिस्टर रुपाली यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता खूप योगदान दिले.